आजारपणाला कंटाळून ११ वर्षीय मुलीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

गौरी राऊत या ११ वर्षीय मुलीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गौरीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. पिंपळे गुरव परिसरातील घटना असून याबद्दल स्थानिकांकडून दु:ख व्यक्त केले जात आहे.

पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस इतरही कारणांचा शोध करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *