मुलुंड परिसरात गर्दुल्ल्यांची दहशत, 15 गाड्या फोडल्या

मुलुंडच्या खिंडीपाडा परिसरात गर्दुल्ल्यांनी रात्रभर अक्षरशः दंगा केला. रात्रभर नशा करत गर्दुल्ल्यांनी १५ गाड्यांची तोडफोड केली. तसंच रस्त्यावरून जाणाऱ्यांनाही मारहाण केली. यामुळे स्थानिक हैराण झाले आहेत. अनेकदा पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या भागात गर्दुल्ले रात्रभर धिंगाणा घालत आहेत. मात्र पोलीस काहीही कारवाई करत नसल्यामुळे नागरिक दहशतीत आहेत. आता गर्दुल्ल्यांनी हिंमत एवढी वाढलीय की रात्री रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवरही हल्ला होतायत. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून एका गर्दुल्ल्याला अटकही झाली आहे.

मी आणि माझी मेहुणी इथे उभे होतो. त्यावेळी चार, पाच जण इथे आले. त्यामधील दोघांनी माझ्यावर हात उचलला. इथे का उभे आहात? इथे उभं राहायचं नाही? उभे राहिलात तर जीवंत मारू? अशी धमकी या गर्दुल्यांकडून सामान्य नागरिकांना देण्यात येत होती. तसेच तेथील स्थानिक महिलेने दिलेल्या माहितीनुसार, गर्दुल्यांच्या हातात सळी होती. गाड्या फोडतच ते लोकं परिसरात फिरत होते. या गर्दुल्यांनी महिला आणि एका पुरूषाला देखील मारहाण केली. यामध्ये पुरूष जखमी झाला आहे.

गेल्या 15 दिवसांपासून या गर्दुल्यांची परिसरात दहशत आहे. सोमवारी रात्री तर त्यांना 15 गाड्यांची तोडफोड केली आहे. तसेच स्थानिकांना देखील मारहाण केली. स्थानिकांनी पोलिसांवर आरोप केले आहेत की,’पोलिस योग्य ती कारवाई करत नाहीत. त्यामुळे गर्दुल्यांमध्ये पोलिसांची भीती नाही.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *