साताऱ्यात स्वच्छतागृहासाठी महिलांची परवड

एकेकाळी मराठ्यांची राजधानी असलेल्या ऐतिहासीक अशा सातारा शहरात महिलांसाठी चक्क स्वच्छतागृहच नाहीत. सातारा शहराची सुंदर शहर म्हणून राज्यभरात ओळख आहे. पण शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहच नाहीत हे एक भयानक वास्तव आहे. सातारा शहराला गेली अनेक वर्षापासून भेडसावणारा प्रश्न म्हणजे महिलांसाठी सुलभ शौचालयाचा…

साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या या सातारा शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोयच नसल्याची बाब समोर आली आहे. सातारा शहरात अनेक वर्षा पासून  महिलांसाठी एक ही सुलभ शौचालय नगरपालिकेच्या  माध्यमातून बांधण्यात आलेले नाही .

त्यामुळे महिलांना आणि महाविद्यालयीन तरुणींना शहरात वावरताना मोठ्या समस्येला तोंड द्याव लागत आहे. साताऱ्यातील राजवाडा परिसरात फक्त एकच  स्वछतागृह आहे. शिवाय हे स्वच्छतागृह खूप अस्वच्छ आहे. त्यामुळे महिलांसाठी ही फार गंभीर बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *