तीन वर्षांच्या बलिकेवर अत्याचार

घोडबंदर येथील ब्रह्मांड भागात गुरुवारी एका तीन वर्षीय मुलीवर तिच्या नातेवाईकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ब्रह्मांड येथील तुर्फेपाडा परिसरात पीडित मुलगी, तिचे वडील, आजी, आत्या आणि आत्याचा नवरा एकत्र राहत होते. गुरुवारी पीडित मुलगी घरात एकटी असताना तिच्या आत्याच्या नवऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. मुलीची आजी घरी आल्यानंतर तिने आजीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आजीने याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *