चुली पुढे शेकणाऱ्या महिलेचा मृत्यू

थंडीत चुली पुढे शेकणाऱ्या ज्येष्ठ महिलेचा जळून मृत्यू झाला. ही घटना पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे बुधवारी (१ जानेवारी) रोजी घडली.

वैजंताबाई रंगनाथ घुंबरे (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे. उब मिळावी म्हणून घरातील पेटविलेल्या चुलीसमोर वैजंताबाई बसल्या होत्या. यावेळी अचानक त्यांच्या साडीने पेट घेतला. घरात कोणीही नसल्याने त्यांच्या किंचाळ्या ऐकून गल्लीतील काहींनी त्यांना मदत करेपर्यंत त्या गंभीरित्या जळाल्या होत्या. परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, त्या ७४ टक्के भाजल्या होत्या. उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *