कोयना-पाटण परिसर भुकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरला

साताऱ्यातील कोयनानगर जवळील घोसाटवाडी (पाटण) भाग भूकंपाच्य सौम्य धक्क्यांनी पहाटे हादरला. २.८ रिश्टर स्केलचा हा सौम्य भुकंप असल्याने कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. पहाटे ६ वाजून ४२ मिनिटांनी परिसरात हे धक्के जाणवले. भूकंपाच्या सौम्य धक्के सातारा जिल्ह्यातील कोयना, पाटण या भागांसह कोकण किनारपट्टीच्या परिसरातही जाणवले आहेत.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, २३ डिसेंबर २०१९ रोजी पहाटे ६.४२ वाजता हा भूकंप झाला. २.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या असलेल्या या भूकंपाचे केंद्र कोयना धरणापासून ८ किमी अंतरावर  जमिनीखाली ५ किमी होते. कोयना, पोफळी, पाटण या भागात या भुकंपाचे धक्के जाणवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *