अनैतिक प्रेमसंबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा प्रकार भाईंदर येथे उघडकीस आला आहे. नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामदेव पार्क भागात राहणारे प्रमोद पाटणकर यांची पत्नी आणि समाधान यांच्यात गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. याची माहिती प्रमोद यांना मिळाल्यानंतर पती आणि पत्नीमध्ये वाद होऊ लागले. प्रमोदला झोपेच्या गोळ्या देऊन तो गुंगीत असतानाच त्याची हत्या करण्याचे दोघांनी ठरवले. १४ जुलैला रात्री दीप्तीने आपल्या मुलीला आई-वडिलांकडे सोडले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने प्रमोदला चहातून झोपेच्या तब्बल २० गोळ्या दिल्या. प्रमोद गाढ झोपल्यानंतर दोरीच्या साहाय्याने गळा आवळून हत्या केली. चहाच्या कपचे निरीक्षण करत असताना लिपस्टिकच्या खुणा संशयास्पद वाटल्या. त्यानंतर मोबाइल संभाषण, हॉटेल, लॉजमध्ये खोटय़ा नावाने नोंद यावरुन हत्येचा डाव पोलिसांनी उघडकीस आणला.
