लोणावळ्यात भिंत अंगावर कोसळल्याने दहा वर्षीय मुलाचा मृत्यू

लोणावळ्यात अतिवृष्टीने एकाचा बळी घेतला आहे. शेजारील घराची भिंत सख्ख्या भाऊ-बहिणीच्या अंगावर कोसळल्याने घडलेल्या दुर्घटने भावाचा मृत्यू झाला तर बहीण जखमी झाली. लोणवळ्यातील हनुमान टेकडी येथे रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. यातील मृत मुलाचे कुणाल अजय दोडके (वय १०) आहे. जखमी झालेल्या बहिणीचे नंदिनी अजय दोडके (वय ९) असे नाव आहे.

मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये रविवारच्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. शनिवारी रात्रीपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. अजुनही ठाणे, कल्याण, अंबरनाथ-बदलापूर भागात पाऊस पडतोच आहे. भारतीय वेधशाळेनेही पुढचे काही तास मुंबई आणि नजिकच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु राहिल अशी शक्यता वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *