पुन्हा पेट्रालचे दर झाले कमी, ‘हे’ आहेत आजचे भाव

आज शुक्रवारी पेट्रोलच्या दरात घट झालीय. आता पेट्रोल खरेदी करण्यासाठी तुम्हाला कमी पैसे द्यावे लागतील. डिझेलची किंमत स्थिर आहे. त्यात बदल झालेला नाही.  दिल्लीत पेट्रोल 11 पैसे स्वस्त होऊन 72.69 रुपये प्रति लीटर झालंय. तर दिल्लीत डिझेलचा जुना भाव 66 रुपयेच प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोल 8 पैसे स्वस्त झालंय. आता इथे पेट्रोलची किंमत 78.34 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल 69.17 रुपये प्रति लीटर कायम आहे.

कोलकत्तामध्ये पेट्रोल 7 पैसे स्वस्त झालंय. त्याची किंमत 75.37 रुपये प्रति लीटर झालीय. डिझेलचा भाव जुनाच म्हणजे 68.19 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत 8 पैसे स्वस्त होऊन 75.52 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेलच्या किमतीत बदल न झाल्यानं त्याची किंमत 69.71 रुपये प्रति लीटर आहे.

असे पाहा पेट्रोलचे दर

पेट्रोलचे दर जाणून घेण्यासाठी SMS करता येतो. इंडियन ऑयल ग्राहक RSP-डीलर कोड-92249 9 2249 वर मेसेज करू शकतो. बीपीसीएल  RSP-डीलर कोड- 9223112222 वर मेसेज करू शकतो. एचपीसीएल ग्राहक HPPRICE-डीलर कोड- 9222201122 इथे मेसेज करू शकतो.

या ऑइल कंपन्यांचे अॅपही आहेत. त्यामार्फतही पेट्रोल – डिझेलचे भाव कळू शकतात. इंडियन ऑयलचं Fuel@IOC, बीपीसीएल ग्राहक SmartDrive अॅप, तर एचपीसीएलचं My HPCL अशी अॅप्स आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *