तुल्यतुलाई सौर ऊर्जा प्लांटमध्ये स्फोट; १ ठार

बीड तुल्यतुलाई सौर ऊर्जा प्लांटमध्ये स्फोट; १ ठार

बीड जिल्ह्यात धारूर तालुक्यातील तुल्यतुलाई सौर ऊर्जा प्लांटमध्ये आज पहाटे झालेल्या स्फोटात एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर लातूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पहाटे तीन-साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला. त्यानंतर लागलेल्या आगीत एक कामगार १०० टक्के भाजला. तर, अन्य दोघे गंभीर जखमी झाले. हा स्फोट इतका तीव्र होता की आजूबाजूच्या गावांतही याचे आवाज ऐकू आले. स्फोट नेमका कोणत्या कारणामुळं झाला हे समजू शकलेलं नाही. सध्या कुणालाही घटनास्थळी जाण्यास मनाई असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *