दोन हजार रुपयांचा कांद्याला द्या हमीभाव

कांद्याला दोन हजार रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव मिळावा, अशी मागणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी लोकसभेत केली. त्यांनी आपले भाषण मराठीत करून शेतीच्या प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी अधिकाधिक प्रोसेसिंग युनिट मिळावेत, कोल्ड स्टोरेज मिळावेत, रेल्वेची वॅगन व कार्गो सेवेमध्ये वाढ करण्याची मागणी केली. खासदार डॉ. पवार यांनी नियोजित ड्रायपोर्टच्या गरजेचे महत्त्व सांगत निफाड येथे त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली. या सर्व कामांमुळे शेतकऱ्यांचा नक्कीच आर्थिक विकास होईल. भारत कृषिप्रधान देश आहे, शेतकरी कृषी व्यवस्थेचा आत्मा आहे. ग्रामीण भागाचा व कृषी क्षेत्राच्या विकासाशिवाय देशाच्या विकासाची कल्पनाच होऊ शकणार नाही. शेतकऱ्यांचा बेसिक डेटा गोळा करण्याचे आवाहनही त्यांनी केले. दिंडोरी मतदारसंघात प्रामुख्याने कांदा, डाळिंब, द्राक्ष, टोमॅटो किंवा मका अशी पिके घेतली जात त्यांची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *