हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

कापडाचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून दोन लाख आणावेत, यासाठी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याने तिने पतीसह सासू व नणंदेविरोधात भोईवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
पती हुसेन सलीम शेख, सासू मुमताज, नणंद रुकसार अशी सासरच्या मंडळींची नावे आहेत. मुस्कान हिचा विवाह २०१८ मध्ये मालाड येथील हुसेन शेख याच्याशी झाला. विवाहानंतर काही दिवसांतच हुसेन याने कापडाचे दुकान टाकायचे आहे, असा बहाणा करून मुस्कानकडे पैशांचा तगादा लावला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *