यमुना एक्स्प्रेस वेवर प्रवासी बस नाल्यात कोसळून २९ जण ठार झाले असून १६ प्रवासी गंभीर जखमी आहेत. लखनऊहून दिल्लीला जात असलेल्या बसचा सोमवारी मध्यरात्री आग्राजवळ अपघात झाला.
मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास सुमारे पन्नास प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस नाल्यात कोसळली. बस चालकाचा डोळा लागल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं असून सध्या बचाव कार्य सुरू आहे.
