ठाण्यातील गार्डनमध्ये बिबळ्याचा ‘मॉर्निंग वॉक’

शहरी वस्तीत बिबळे घुसण्याच्या घटना सुरूच आहेत. ठाण्यातील मानपाडा येथील एका उद्यानात आज सकाळी बिबळ्या आल्यानं घबराट उडाली होती. मात्र, काही वेळातच हा बिबळ्या स्वत:हून निघून गेल्यानं नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

वन विभागाच्या फुलपाखरू उद्यानात  नागरिकांना आज बिबळ्याचं दर्शन झालं. यावेळी मॉर्निंग वॉकसाठी लोकांची वर्दळ होती. लोकांची गर्दी पाहून बिबळ्या जागीच थांबला होता. ही बाब वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच खबरदारी म्हणून त्यांनी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या पासधारकांना बाहेर काढले. त्यानंतर बचाव पथकला पाचारण करण्यात आले. मात्र, बचाव पथक येण्यापूर्वीच बिबळ्या तारेच्या कुंपनावरून उडी मारून निघून गेला, असं प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *