नाशिकमध्ये हाडाचे सापळे सापडल्यानं खळबळ

नाशिकमधील आरटीओ कार्यालयाच्या सौरक्षक भिंतीलगत मानवी हाडांचे सापळे आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. डोक्याची कवटी आणि दोन पायांचे भाग इथं वेगवेगळ्या ठिकाणी सापडले आहेत. कुणा अज्ञात पुरुषाचा हा मृतदेह असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.नाशिकमधील पेठ रोडवर आरटीओ कार्यालय आहे. या परिसरातील म्हसरूळ पोलीस ठाणे व आरटीओ कार्यालयाच्या दरम्यान मोकळी जागा आहे. इथंच मानवी सापळा आढळला आहे. भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची शक्यता आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *