अज्ञात वाहनाच्या धडकेने पती ठार, पत्नी गंभीर; भंडारा जिल्ह्यातील घटना

जिल्ह्यातील लाखांदूर-परसोडी मार्गावर सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एका अज्ञात वाहनाची धडक बसून मोटरसायकलवरून जात असलेल्या दांपत्यापैकी पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. लोकेश बोदाराम दिघोरे असे या मृत इसमाचे नाव असून, तो पत्नीसह सासुरवाडीला जात असताना हा अपघात घडला.
अज्ञात वाहनाने दिलेली धडक इतकी जबरदस्त होती की, त्या धडकेनंतर मोटरसायकलची टाकी फुटून तिने पेट घेतला व जळून खाक झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *