साताऱ्यात ४.८ रिश्टर स्केलचा भूकंप

सातारामध्ये आज सकाळी भूंकपाचे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता ४.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेची होती. भूंकपाचा केंद्रबिंदू हा कोयनापासून १० किमीच्या अंतरावर होता. या भूकंपामुळे परिसरात काही वेळ घबराट पसरली होती.

सकाळी ७.४८ वाजता कराड आणि पाटण परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता मोठी असली तरी कमी सेकंदासाठी भूकंप जाणवला. त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती आहे.  या भूकंपामुळे कोयना परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये  भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *