ज्येष्ठ तबलावादक बापू पटवर्धन यांचे निधन

ज्येष्ठ तबलावादक पंडित प्रभाकर पटवर्धन उर्फ बापू पटवर्धन यांचे आज रात्री आठच्या सुमारास निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेले ४० दिवस ते भायखळा येथील रेल्वे रुग्णालयात दाखल होते. आज हृदय बंद पडून त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे आणि शिष्यगण असा परिवार आहे.

बापू पटवर्धन यांनी आपले काका तसेच गुरू अहमदजान थिरकवा यांच्याकडे तबल्याचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी थिरकवा घराण्याच्या वादनाचा प्रसार केला. रेल्वेतून निवृत्तीनंतर त्यांनी एकल तबल्याचे कार्यक्रम केले. त्यांनी कॅन्सरलाही मात दिली होती, असे त्यांचे शिष्यगण सांगतात. ३० किमो झाल्यानंतर त्यांनी कोलकात्याला जाऊन कार्यक्रम सादर केला.

दरम्यान, कांजिण्या झाल्याचे निमित्त झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांना न्युमोनियाही झाला. गेले ३० दिवस ते मृत्युशी झुंज देत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *