गोरेगावमधील कामा इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून अग्निशमन दलाचे १२ बंब घटनास्थळी पोहोचले आहेत.
कामा इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास आग लागली. आग झपाट्याने पसरत गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाच्या पथकानेही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे १२ बंब घटनास्थळी असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कामा इंडस्ट्रीयल इस्टेटमधील ज्या गोदामात आग लागली ते गोदाम धर्मा प्रॉडक्शनचे आहे.
