काँग्रेस नेता इम्रान मसूदने केला पत्नीसोबत डान्स, मौलाना भडकले

सहारनपूरचे काँग्रेस उमेदवार इम्रान मसूद पत्नीसोबत सार्वजनिक ठिकाणी नृत्यं केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अनेक मुस्लिम धर्मगुरुंनी त्यांच्यावर टीका केली असून त्यांना माफी मागण्याचे आवाहन केलं आहे.

काही दिवसांपूर्वी इम्रान मसूद आणि त्यांची पत्नी एका फंक्शनला गेले होते. तिथे ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ या सुप्रसिद्ध हिंदी गीतावर मसूद यांच्या पत्नीने नृत्य करायला सुरुवात केली. नंतर मसूद ही तिच्यासोबत नाचायला लागले. दोघांचाही नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमुळे मसूद यांच्यावर टीकेची झोड उठते आहे. पत्नीसोबत सार्वजनिक ठिकाणी नृत्य करणं हराम आहे. इस्लाम अशा कृत्याची परवानगी देत नाही म्हणून मसूद यांनी यासाठी माफी मागायला हवी असं आवाहन मौलाना देहलवी यांनी केलं आहे. तसंच स्थानिक मुस्लिम समाजानेही या कृत्याचा निषेध केला आहे.

आता लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या मसूद यांना हे कृत्य महागात पडते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. २०१४च्या निवडणुकीतही नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर मसूद यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *