सेल्फी घेताना पाय घसरून तरूणाचा मृत्यू

सेल्फीच्या नादात एका तरुणाचा पाय घसरुन मृत्यु झाल्याची घटना शनिवारी घडली. लोणावळा येथे ही घटना घडली असून रवींद्र काशीनाथ शेटे (वय २३) असे मृत तरूणाचे नाव असून तो राहुरीतील येवले आखाडा येथील रहिवाशी आहे.

रवींद्र शेटे हा लोणी येथील नर्सिंग महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. शनिवारी पहाटे आपल्या मित्रांसमवेत तो लोणावळा येथे फिरण्यासाठी गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास हिल स्टेशनवर गेल्यानंतर त्या ठिकाणी मोबाइलमध्ये सेल्फी घेत असताना रवींद्र याचा पाय घसरला. तो सुमारे पन्नास फूट खोल दरीत पडला. इतरांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्याला वर आणून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डोक्याला मार लागून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रविवारी येवले आखाडा येथे रवींद्र याचयावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *