श्रुती हासनचं ब्रेकअप!

श्रुती हासनचं ब्रेकअप!

अभिनेत्री श्रुती हासन आणि तिचा इटलीचा बॉयफ्रेंड मायकल कोर्सेल यांनी नुकतंच ब्रेकअप केलं आहे. २०१६ मध्ये एका मित्राकडून लंडनमध्ये ओळख झाल्यांनतर त्यांनी आपल्या नात्याची सुरुवात केली होती. त्या नंतर मायकल अनेक वेळा भारतातही येऊन गेला होता. त्याने श्रुतीचे वडील, कमल हासन यांची भेटही घेतली होती. कमल हासन यांच्या ‘विश्वरूपम 2’ मध्ये त्याने सैनिकाची भूमिकाही निभावली होती. श्रुतीच्या ३३ व्या वाढदिवसादिवशी, २८ जानेवारीला हे जोडपं लॉस एंजिलिसमध्ये दिसलं होतं. अगदी मागच्या महिन्यापर्यंत दोघांच्यात सगळं सुरळीत चालू असताना अचानक झालेल्या ब्रेकअपमुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *