लावा कंपनीने आपला ४ जी फीचर फोन ‘लावा ३४ सुप लाँच केला आहे. लावाचा हा फोन ४जी फीचर फोन असून तो जिओफोनला टक्कर देण्यासाठी बाजारात उतरवण्यात आला आहे. लावाचा ३४ सुपर फीचर फोन ब्लॅक-रेड आणि सनराईज गोल्ड कलर या दोन रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. या फोनची किंमत केवळ १ हजार ७९९ रुपये इतकी आहे. लावाचा हा स्वस्त फोन असून या फोनमध्ये जिओसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. गेल्यावर्षी मायक्रोमॅक्सने भारत १ ४ जी फीचर फोन भारत संचार निगम लिमिटेडसोबत लाँच केला होता.
Lava 34 Super ची वैशिष्ट्ये
>> २.४ इंचाचा डिस्प्ले, एक वर्षाची वॉरंटी
>> ८ वेगवेगळ्या भाषांना सपोर्ट करणार
>> २५०० एमएएच क्षमतेची बॅटरी
>> ३० तासांपर्यंत टॉकटाइम, कंपनीचा दावा
>> १.३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा
>> मेमरी कार्डच्या साहायाने ३२ जीबीपर्यंत फोन स्टोरेज
>> ३.५ एमएमचा हेडफोन जॅक
