पुण्यात पाकिस्तानी सिरीअल बघत असल्याने पतीने पत्नीचा अंगठा कापला

पुण्यात एका ४० वर्षीय व्यक्तीने मोबाईलवर पाकिस्तानी सिरीअल बघत असताना पत्नीचा अंगठा कापला. आरोपी आसिफ सत्तार हा होर्डिंग्स लावण्याचं काम करतो. पत्नीवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली स्वारगेट पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की, सोमवारी सकाळी या दाम्पत्यामध्ये वाद झाला. महिलेने मुलाला दुकानात दूध आणण्यासाठी पाठवलं होतं. पण जेव्हा महिलेला कळलं की दुधाची पिशवी खराब झाली आहे तर ती मुलाला ओरडू लागली. या दरम्यान पतीने हस्तक्षेप केला.

महिलेने म्हटलं की, जेव्हा आसिफ घरी आला तेव्हा त्यांने तिच्यासोबत भांडण केलं. त्यानंतर ती रागात बेडरुममध्ये निघून गेली. मी बोलत नसल्याने आसिफ माझासोबत बोलण्यासाठी बेडरुममध्ये आला. पण तेव्हा मोबाईलवर मी पाकिस्तानी सिरीअल बघत असताना त्याला राग आला.’

आसिफला वाटलं की पत्नी त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. मोबाईलवर सिरीअल बघण्याला ती अधिक महत्त्व देत आहे. त्यामुळे रागात त्याने पत्नीवर हल्ला केला. ज्यामुळे पत्नीचा अंगठा हातापासून वेगळा झाला. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकूण शेजारच्या लोकांनी धाव घेतली आणि महिलेला रुग्णालयात दाखल केलं. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *