परंतु एक्सरे आणि एमआरआयमध्ये देखील त्याच्या आजाराचं निदान होऊ शकलं नाही. त्यानंतर निलेशला तब्बल १२ तास डॉक्टरांच्या देखरेखीखालीठेवण्यात आलं. परंतु इथंही आजाराचं निदान होत नसल्यानं त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पुढील उपचारांसाठी निलेशला जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं त्याच्या आजाराचं नेमकं निदान करण्यात डॉक्टरांना यश आलं.
निलेशनं त्याच्या सर्व अवयवांरील ताबा गमावला होता. त्याचे जुने रिपोर्ट्स पाहून आम्ही इसीजी आणि काही रक्ताच्या चाचण्या केल्या. त्यात निलेशच्या रक्तातील पोटॅशियमची पातळी फारच कमी झाल्याचं निदर्शनास आलं. दिवाळीत गोड पदार्थ आणि मिठाई जास्त खाल्ल्यानं त्याच्या रक्तातील पोटॅशियम कमी झालं होतं अशी माहिती जहांगीर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिली. निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ त्याच्यावर उपचार सुरू केले त्यामुळं त्याच्या तब्येतीत झपाट्यानं सुधारणा झाली.
