विटांनी भरलेला ट्रक उलटला, चार जखमी

विद्याविहार स्थानकाजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटलाय. अपघातात चार जण जखमी आहेत. जवळच्या रुग्णालयात या चौघांवर उपचार सुरू आहेत. या ट्रकच्या खाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

मदत यंत्रणा आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ बाहेरच हा अपघात घडलाय.

ट्रकचं एक चाक ड्रेनेजमध्ये अडकल्यानं ट्रक उटल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.

विद्याविहार हे मध्य रेल्वे मार्गावरचं एक वर्दळीचं स्टेशन आहे… त्यामुळे अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झालीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *