jio Monsoon Offer कोणत्याही जुन्या फोनच्या बदल्यात नवा जिओफोन अवघ्या ५०१ रुपयांमध्ये

रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओफोनसाठी एका धमाकेदार ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत कोणत्याही जुन्या फिचर फोनच्या बदल्यात नवा जिओफोन अवघ्या ५०१ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. जिओच्या जुन्या ग्राहकांचे फोनही नव्या Jio phone-2 च्या फिचर्ससह अपडेट होतील. jio Monsoon Offer शुक्रवारी लॉन्च होत आहे.

२० जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजून १ मिनिटांनी ही ऑफर सुरू होत आहे. यामध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीचा जुना फिचर फोन घेऊन जिओचा नवा Jio phone-2 खरेदी करु शकतात. बदलण्यासाठी आणलेला फोन कार्यरत असावा एवढीच अट आहे. अशाप्रकारे १५०० रुपयांच्या फोनसाठी तुम्हाला केवळ ५०१ रुपये द्यावे लागतील. या ऑफरद्वारे आपली ग्राहकसंख्या १०० मिलियनपर्यंत पोहोचवण्याचा कंपनीचा विचार आहे.

५ जुलै रोजी रिलायन्सच्या ४१व्या सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी आपला दुसरा फिचर फोन Jio Phone 2 हा लॉन्च केला होता. या फोनमध्ये व्हॉट्स अॅप, फेसबुक आणि यु ट्यूबचाही सपोर्ट असणार आहे. मात्र, कंपनीने घोषणा केल्यानुसार १५ ऑगस्टनंतरच हे तिन्ही अॅप्स फोनवर कार्यरत होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *