कोल्हापुरात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. कोल्हापूर – गगनबावडा रोडवर हा अपघात झाला. अपघातात एका ६२ वर्षीय महिला प्रवाशाचा मृत्यू झाला असून, १२ प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बसमध्ये एकूण २० प्रवासी प्रवास करत होते. सतत पाऊस पडत असल्या कारणाने दृश्यमानता कमी झाली असून, त्यामुळे अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, दरम्यान अपघातामुळे दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक पुर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहेत.