दहावीचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभागाने मारली बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही १०वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. यंदा दहावीचा निकाल ८९. ४१ टक्के इतका लागलाय. त्यामध्ये ९१.९७ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्यायत, तर ८७.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९६ टक्के इतका लागलाय. तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागलाय.

महाराष्ट्र बोर्डाच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  • दहावीचा एकूण निकाल ८९.४१ टक्के
  • दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकण विभागाने मारली बाजी
  • कोकण विभागाचा निकाल ९६ टक्के
  • मुंबई विभाग – ९०.४१ टक्के
  • पुणे विभाग – ९२.०८ टक्के
  • नाशिक – ८७.४२ टक्के
  • कोल्हापूर विभाग – ९३.८८ टक्के
  • औरंगाबाद – ८८.८१ टक्के
  • नागपूर – ८५.९७ टक्के
  • लातूर – ८६.३० टक्के
  • अमरावती – ८६.४९ टक्के
  • बोर्डातर्फे ५७ विषयांची परीक्षा घेण्यात आली त्यापैकी ११ विषयांचा निकाल १०० टक्के
  • दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल – ८६.८७ टक्के
  • गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षाची टक्केवारी ०.६७ टक्के
  • शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा – ४०२८
  • शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळा – ३३
  • ९ विभागांमधून १६ लाख २८ हजार ६१३ विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी १४ लाख ५६ हजार २०३ विद्यार्थी उत्तीर्ण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *