पॉवर बँकच्या स्फोटात घराचं मोठं नुकसान

जर आपन मोबाईल चार्जिंगसाठी पावर बँक वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. बीड शहरातील माणिक अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एका पॉवर बँकचा स्फोट झाला आहे. या स्फोटात घराचं मोठं नुकसान झालं आहे. पावर बँकचा स्फोट झाल्यानंतर घरातील वस्तुंना आग लागली. यावेळी घरात कोणीही नसल्यामुळे सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र स्फोटाची तिव्रता जास्त असल्यामुळे घराचं मोठं नुकसान झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *