औरंगाबादमध्ये व्हिडीओकॉन कंपनीत भीषण आग

औरंगाबादच्या चितेगाव येथील व्हिडीओकॉन कंपनीत भीषण आग लागली आहे. कंपनीच्या बाहेर भंगार सामान ठेवले होते. त्या भंगाराला ही आग लागली आहे. भंगारात थर्माकोल, कागदाचे पुठ्ठे याचं प्रमाण जास्त असल्यानं आग चांगलीच भडकली आहे. दुरूनही धुराचे लोळ आकाशात दिसत आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे, दरम्यान ही आग कशामुळं लागली याची माहिती अजून मिळू शकली नाही आहे. मात्र या आगीत मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *