पेट्रोलच्या दरात घसरण पण फक्त १६ पैशांची!

मागील काही दिवस इंधन दरवाढीचे चटके सहन करणाऱ्या ग्राहकांना पेट्रोलियम कंपन्यांनी काही पैशांचा दिलासा दिला आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये आज कपात झाली असून पेट्रोल १५ पैसे तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले आहे.

कर्नाटक निवडणुकीदरम्यान, इंधन दरात वाढ करण्यात आली नव्हती. निवडणुकीनंतर सलग १६ दिवस इंधन दरात वाढ करण्यात आली होती. त्यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यानंतर आता काही पैशांनी इंधनाच्या दरात कपात करण्यात येत आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर ८५.७७ पैसे असून डिझेलचा दर ७३.४३ पैसे इतका झाला आहे.

मागील दरवाढीच्या सलग १६ दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात सुमारे ३.८ रुपये, तर डिझेलच्या दरात ३.३७ रुपयांनी वाढ झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *