मुलाची हत्या करून संगीत शिक्षकाची आत्महत्या

घोडबंदर येथील वाघबीळ भागात एका संगीत शिक्षकाने स्वत:च्या सात वर्षांच्या मुलाची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यातील मजकुराविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.

शौमिक घोष (३९) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. वाघबीळ भागातील विजय एन्क्लेव्ह या गृहसंकुलात शौमिक राहत होता. बुधवारी दुपारी शौमिक याने वाहनचालकास काही कामानिमित्त घराबाहेर पाठविले होते. त्यानंतर त्याने उशीने तोंड दाबून मुलगा एकांशची हत्या केली आणि त्यानंतर पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. वाहनचालक घरी परतल्यानंतर शौमिक घराचा दरवाजा उघड नसल्याने त्याने पोलिसांना बोलविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घराचा दरवाजा तोडला. त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *