फांदी अंगावर पडून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या परिसरात झाडाची फांदी अंगावर पडून लीला गोकुलदास सुखी (९१) या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. या दुर्घटनेमुळे पावसाळ्यात धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

तलावाजवळ फेरफटका मारताना फांदी अंगावर पडल्याने लीला यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना जी. टी. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. लीला त्यांच्या लहान बहिणीसोबत बाणगंगा परिसरात राहत होत्या. या दोन बहिणीच एकमेकींचा आधार होत्या. पालिकेच्या धोरणानुसार पालिकेच्या अखत्यारितील रस्ते, फुटपाथवरील झाड कोसळून मृत्यू झाल्यास एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. मात्र, खासगी ठिकाणी असलेल्या झाडाची फांदी पडून ही घटना घडल्याने लीला यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळू शकणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *