राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुखलालू प्रसाद यादव यांना हृदय आणि किडनीवर उपचारासाठी मुंबईत आणले आहे. लालूंना वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले असून ५ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार ५ डॉक्टरांचे पथक आहेत.
लालू प्रसाद यादव यांना मुंबईत आणले असून त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप, सून ऐश्वर्या आणि मुलगी मीसा भारती हे सर्व त्यांच्यासोबत आहेत. लालू प्रसाद यादव यांना हृदय आणि किडनीचा आजार आहे. लालू यांच्या हृदयावर उपचार करण्यासाठी पाच डॉक्टरांच्या पथकात जनरल सर्जन, फिजिशियन, नेफरॉलजिस्ट, डॉयबेटॉलजिस्ट आणि कार्डियॉलजिस्ट डॉक्टरांचा समावेश आहे. हे पाच डॉक्टर लालू प्रसाद यादव यांच्यावर उपचार करणार आहेत.
लालू प्रसाद यादव यांना गेल्यावर्षी २३ डिसेंबर रोजी चारा घोटाळ्यात शिक्षा सुनावण्यात आली होती. आरोग्याच्या कारणांमुळे त्यांना झारखंड हायकोर्टाने सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पटणाच्या इंदिरा गांधी इंस्टि्यूट ऑफ मेडिकल सायसेन्सच्या रिपोर्टच्या आधारावरून त्यांना उपचारासाठी मुंबईला जाण्याची परवानगी देण्यात आली. हॉस्पिटलच्या अहवालानुसार, लालू प्रसाद यादव यांच्या दोन्ही किडन्या व्यवस्थित काम करू शकत नाहीत. तसेच त्यांचा रक्तदाबही हाय आहे. मुंबईत हृदयावर यशस्वी उपचार केल्यानंतर लालू यांना किडनीवरील उपचारासाठी बेंगळुरूला नेण्यात येणार आहे.