इंडिगो, इंडिका आता मिळणार नाहीत!

काही वर्षांपूर्वी भारतीयांची पहिली पसंती ठरलेल्या ‘इंडिका’ आणि ‘इंडिगो’ या गाड्यांचं उत्पादन टाटा मोटर्सनं बंद केलंय. बाजारातील प्रचंड स्पर्धा आणि कमी झालेली विक्री या कारणांमुळे ‘टाटा’नं हा निर्णय घेतला आहे.

‘एसआयएएम’च्या आकडेवारीनुसार, मार्च २०१८पर्यंत ‘इंडिका’चे २,५८३ तर ‘इंडिगो’चे १,७५६ युनिट्स विकले गेले आहेत. मागील काही वर्षांच्या तुलनेत हा खप अत्यंत कमी आहे. त्यामुळंच एप्रिलपासून या गाड्यांचं उत्पादन थांबवण्यात आलं आहे. उत्पादन बंद झालं असलं तरी या गाड्या वापरणाऱ्यांना विक्रीनंतरच्या सर्व सेवा पूर्वीप्रमाणेच मिळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *