महिनाभरापूर्वी झालं होतं तिचं लग्न, गळफास घेऊन संपवलं आयुष्य

महिनाभरापूर्वीच माप ओलांडून ती सासरी आली होती. मात्र, ज्या घरात तिनं सुखी संसार करण्याची स्वप्नं पाहिली होती, त्याच घरात तिनं स्वतःची जीवनयात्रा संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं. मंगळवारी (22 मे )ही घटना घडली आहे.  वैशाली दीपक सोनवणे (वय 22 वर्ष) असे आत्महत्या  करणाऱ्या विवाहितेचं नाव आहे. महिन्याभरापूर्वीच वैशालीचं लग्न झालं होतं.

मंगळवारी रात्रीच्या सुमारास वैशालीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिला तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैशालीला मृत घोषित केले. दरम्यान, वैशाली सोनवणेनं आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *