एसटीत चढताना सोन्याची पोत लांबविली

गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एसटीत चढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ३१ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळपोत लागविली. चाळीसगाव बस स्थानकात ही घटना घडली.

मालेगाव येथील काशिनाथ भिका चव्हाण व त्याच्या पत्नी गिरजाबाई चव्हाण हे नातेवाईकाच्या लग्नासाठी तालुक्यातील लांबेवडगाव येथे आले होते. मालेगाव येथे परतण्यासाठी ते दुपारी ४.४५ वाजता चाळीसगाव बसस्थानकात आले. नाशिक बस लागली असता बसमध्ये चढताना खूप गर्दी असल्याने एसटीत जागा संभाळण्यासाठी काशिनाथ चव्हाण हे अगोदर चढले. त्यानंतर गिरजाबाई चढल्या. तेव्हा त्यांनी आपल्या गळ्यातील मंगळपोत पाहिली असता ती दिसून आली नाही. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आजुबाजूला विचारपूस केली परंतु, कोणी काहीही सांगितले नाही. त्यात काशिनाथ चव्हाण यांची तब्येत खराब झाल्याने त्यांनी एसटी थांबविली नाही. यानंतर मालेगाव येथे औषधोपचार घेऊन त्यांनी रविवारी शहर पोलिस ठाणे गाठत ६० हजार रुपये किमतीची मंगळपोत चोरी गेल्याची तक्रार नोंदविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *