मिलिंद नार्वेकरांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

शिवसेना सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी लीलावती रुग्णालयात उपचार घेणा-या छगन भुजबळ यांची भेट घेतलीय. नार्वेकर आणि भुजबळ यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यावेळी त्यांच्यासोबत नाशिकमधले पक्षाचे पदाधिकारी दत्ता गायकवाडही होते. भुजबळ- नार्वेकर भेटीला सोमवारी नाशिकमध्ये होणा-या विधानपरिषद निवडणुकीची पार्श्वभूमीही असल्याचं बोललं जातंय. शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे अशी ही लढत होतेय… नाशिकच्या राजकारणात भुजबळ यांचं अजूनही प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शिवसेनेला सहकार्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *