बिपीन गांधी यांचे हृदयविकाराने निधन

पंचवटी एक्स्प्रेसला आदर्श एक्स्प्रेस बनविण्यात मोलाचा वाटा असलेले रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी  (वय ६५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पंचवटी एक्स्प्रेसच्या २१ डब्यांच्या नवीन गाडीच्या स्वागतासाठी ते नाशिकरोड रेल्वे स्थानकात आले होते. तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

गांधी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. पंचवटी एक्स्प्रेसच्या नवीन २१ डब्यांच्या गाडीच्या स्वागतासाठी ते रेल्वेस्थानकावर आले होते. मात्र नवीन गाडी स्थानकात येण्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते रेल्वे स्थानकावर कोसळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *