काश्मीरमध्ये दगडफेकीत पर्यटक ठार

काश्मीर खोऱ्यात जमावाने केलेल्या दगडफेकीत तमिळनाडूतील आर. तिरुमणी (वय २२) हा पर्यटक ठार झाला. श्रीनगरच्या नारबल भागात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.

‘या घटनेने माझी मान शरमेने झुकली आहे,’ अशी प्रतिक्रिया जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केली आहे. तिरुमणी हे टॅक्सीतून जात होते. त्यावेळी जमावाने टॅक्सीवर तुफान दगडफेक केली. त्यात दगड लागून तिरुमणी हे मृत्युमुखी पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *