राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना आणखी दोन दिवस वैद्यकीय देखरेखीखाली केईएम रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. अन्य आजारांसह स्वादुपिंडाचा दाह होत असल्यामुळे त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
भुजबळ यांच्यासाठी डॉक्टरांचे विशेष पथक नेमण्यात आले असून त्यांच्याकडून वेळोवेळी भुजबळ यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती मिळत असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याच्या भेटीसाठी रुग्णालयात समर्थक, कार्यकर्ते त्यांची भेट घेण्यासाठी येत आहेत.
