वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या

वरळीतील संत मीराबाई मुलींच्या वसतिगृहात शीतल शिर्के (२०) या विद्यार्थिनीने गुरुवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शीतल माहीमच्या कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा करत होती. वसतिगृहातील इतर मुली परतल्यावर शीतलने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तत्काळ तिला रुग्णालयात नेले मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *