फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला

फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला आहे. मध्यप्रदेशातील इंदूर येथे हा हल्ला करण्यात आला. इंदूरपासून 15 किलोमीटर अंतरावर घटना घडली आहे. सुषमा अंधारे एका कार्यक्रमातून परतत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात सुषमा अंधारे जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

बुधवारी रात्री सुषमा अंधारे कार्यक्रमातून परतत असताना रात्री एका गाडीने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या गाडीवर कोणतीही नंबर प्लेट नव्हती. हल्लेखोरांनी तीनवेळा गाडी सुषमा अंधारे यांच्या गाडीला धडक दिली. सुषमा अंधारे जखमी झाल्या असून त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर मार लागला आहे.

हल्ला झाला तेव्हा अंधार असल्या कारणाने हल्लेखोर नेमके किती आणि कोण होते याचा अंदाज येऊ शकला नाही. सध्या हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *