शेतातील माती चोरली म्हणून गुन्हा दाखल

शेतातील माती  चोरल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जटवाडा परिसरात जेगवाडा शिवारात सतीश भगवंतराव तळेकर (रा. वेदांतनगर, रेल्वे स्टेशन) यांचे शेत आहे. या शेतातील गडी बालाजी मुपडे याचा फोन तळेकर यांना आला. त्यानुसार गेल्या पाच दिवसांपासून एक महिला आरोपी आणि रामदास राठोड (रा. चिमण, पीरवाडी), टेम्पोचालक मुसा हाजी, राम किसन राठोड, अनिल गाडेकर (रा. सर्व चिमण पीरवाडी, जोगवाडा, जटवाडा) हे शेतातील मातीची चोरी करित होते. गेल्या चार ते पाच दिवसांत पन्नास मातीच्या ट्रीप या संशयितांनी चोरून २५ हजारांची माती चोरल्याची फिर्याद तळेकर यांनी हर्सूल पोलिस ठाण्यात दिली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *