ज्योतिषाचार्य बेजान दारूवाला यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका

बॉलिवूडमध्ये ‘भविष्य’शी निगडीत अनेक प्रकारचे फंडे आजमावले जातात. सिनेमाच्या नावापासून त्याच्या रीलिज डेट पर्यंत अनेक गोष्टींबाबत ज्योतिषांचा सल्ला घेतला जातो. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना सल्ला देणार्‍या बेजान दारूवाला यांना ब्रेन स्टोकचा तीव्र झटका आला आहे.

फेसबुक पोस्टवर माहिती 

बेजान दारूवाला यांनी फेसबूक पोस्ट्च्या माध्यामातून त्यांना ब्रेनस्टोकचा झटका आल्याची माहिती शेअर केली आहे. त्यांना एक दिवस व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होतं. इतक्या गंभीर झटक्यातून सही सलामत बाहेर पडणं ही किमया आहे. असे डॉक्टरांचं मत असल्याची माहिती त्यांनी शेअर केली आहे. चाहत्यांच्या प्रेमामुळे, शुभार्शिवादामुळे मी बचावले. गणेशाची माझ्यावर कृपा आहे. त्यामुळे लवकरच या आजारातून बाहेर पडेन असेही दारूवाला यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *