नागपूर पोलिसांनी जप्त केले ३ कोटी रूपये, हवालाची रक्कम असल्याचा संशय…

छत्तीसगडच्या रायपूरहून चारचाकी वाहनात आणलेली सुमारे ३ कोटी रुपयांची रोकड नागपूर पोलिसांनी सापळा रचून पकडली. ही रक्कम हवाल्याची असल्याचा संशय पोलिसांना आहे. रायपुरचे सराफा व्यापारी खजान ठक्कर यांची ही रोकड असून नागपूरच्या एका व्यापा-याकडे त्यानं ही रक्कम हवालाच्या माध्यमातून आणल्याचं सांगितले जातंय. रायपुरहून नागपूरला एका डस्टर कारमधून रोकड येत असल्याची गुप्त सूचना पोलिसांना मिळाली. या सूचनेच्या आधारावर पारडी मार्गावर पोलिसांनी सापळा लावला. प्रशांत केसांनी याच्या मालकीची ही कार असल्याची माहीती त्या दोघांनी पोलिसांना दिली. लॉकर उघडल्यावर त्यात २ हजार, पाचशे आणि दोनशेच्या नोटांची बंडल होती. गाडीतून एकूण  तीन कोटी 22 लाख रुपये होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *