पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्रातील जवान किरण थोरात यांना वीरमरण

नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून, पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्रातील अजून एका शूर जवानाला वीरमरण आले आहे.  पाकिस्तानकडून राजौरी परिसरात काल करण्यात आलेल्या गोळीबारात महाराष्ट्रातील जवान किरण थोरात यांना वीरमरण आले आहे. किरण थोरात हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील रहिवासी आहेत.

जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू असून, काल पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात जवान किरण थोरात यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक दोन वर्षांची मुलगी आहे. त्याआधी गेल्याच आठवड्यात पाकिस्तानने पुंछ जिह्यातील कृष्णाघाटी येथील नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात  महाष्ट्रातील परभणीतील पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शिपाई शुभम मुस्तापूरे शहीद झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *