जनावरापेक्षाही क्रूर ! चिमुरड्याची हत्या करुन खाल्लं त्याचं मांस, न्यायालयाकडून फाशीची शिक्षा

उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात एका क्रूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सहा वर्षाच्या चिमुरड्याची हत्या करुन त्याचं मांस खाल्ल्याच्या आरोपाखाली जिल्हा न्यायालयाने दोषीला फाशीची शिक्षा आणि २५ हजाराचा दंड ठोठावला. न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या निर्णयाचं लोक कौतूक करत आहेत.

अमरिया पोलीस ठाण्याअंतर्गत गतवर्षी २१ फेब्रुवारी २०१७ रोजी नजीम मियाँ नावाच्या एका व्यक्तीने शेजारी राहणा-या सहा वर्षीय मोहसीनचं अपहरण केलं होतं. अपहरण केल्यानंतर त्याच्यावर अत्याचार करत हत्या केली. आरोपी नजीम मियाँने क्रूरतेची परिसीमा गाठत त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि खाल्ले. इतकंच नाही तर त्याने त्याचं रक्तही प्यायलं. पोलिसांनी त्याला मांस खाताना आणि रक्त पिताना रंगेहात पकडलं होतं. आरोपी नजीम अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. पोलिसांना त्याच्यावर ताबा मिळवण्यासाठी बराच वेळ लागला.

मंगळवारी आरोपी नजीमला फाशीचा शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश संजीव शुक्ला यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नजीमला दोषी ठरवत कलम ३०२ अंतर्गत मृत्यूदंड आणि ३७७ अंतर्गत दहा वर्षांची शिक्षा तसंच पॉक्सो अॅक्ट अंतर्गत जन्मठेपेच्या शिक्षेसोबत २५ हजारांचा दंड ठोठावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *