सासू-सासऱ्यांवर हात उगारणा-या पत्नीमुळे घटस्फोट

वयोवृद्ध सासू-सास-यांना छळणा-या व त्यांच्यावर हात उगारणा-या पत्नीमुळे नागपूर खंडपीठाने पतीला घटस्फोट मंजूर केला. पत्नीची क्रूरता सिद्ध करणारे विविध पुरावे पतीने सादर केले होते. त्या आधारावर न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी हा निर्णय दिला.
या प्रकरणातील दाम्पत्याचे २३ मे २०१३ रोजी लग्न झाले होते. पत्नी लग्नाच्या दिवसापासूनच विचित्र वागत होती. ती लग्न मंडपातही निर्धारित वेळेपेक्षा दोन तास विलंबाने पोहोचली. वयोवृद्ध सासू-सासºयांसोबत क्षुल्लक कारणांवरून ती भांडणे करीत होती. त्यांच्यावर हात उगारत होती. त्यांच्याशी असभ्य भाषेत बोलत होती. सासू-सासºयाला एकटे सोडून स्वतंत्र राहण्याचा हट्ट करीत होती. कोणती गोष्ट मनाविरुद्ध झाल्यास आत्महत्या करण्याची धमकी देत होती.
उच्च न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेत पत्नीला क्रूर
ठरवून पतीला घटस्फोट मंजूर केला. कुटुंब न्यायालयाने घटस्फोटाची याचिका खारीज केल्यानंतर पतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *